Saturday 26 December 2015

“म्हणून आयुष्य मला खूप आवडत....”

“म्हणून आयुष्य मला खूप आवडत....”

प्रत्येक वाढदिवसाला
माझं आयुष्य एका उंच ऊंच
टेकडीवर पोचतं
वरून,मी आले तोच रस्ता
मला साफ साफ दाखवतं....

पार केलेली वळण
चुकवलेले खड्डे
न दिसल्याने अडखळले
ते गतिरोधक
कडेची वृक्षराजी

चहूकडच आकाश
त्यातले अप्रतिम रंग
उडणारे पक्षी हिरवीगार शेत
उदास बंजर कुरण

दुःखी बायाबापड्या
उपाशी पोर
सारं सारं नजरेला पडतं
त्यांना आनंदात ठेवण्याचं स्वप्न
माझं मन पहात

म्हणून आयुष्य मला खूप आवडतं.

भेटलेली माणसं,कुटुंबी प्रियजन
त्यांच हसणं,त्यांच्या लकबी
त्यांच्यातला गुडनेस,प्रामाणिकपणा
अन् ‘लगे रहो’ च्या ताकदीवर
जीव ओवाळून टाकावासा वाटतो

करीना ची zero figure
पाहून जिम मध्ये जावं
धरतीचा भार जरा उतरवून पहावं
असं मनापासून वाटत.....
तरी सुंदर पदार्थांना न्याय
द्यायला मन भरीला पाडत
म्हणून आयुष्य मला खूप आवडत..

कुणाकुणाच्या डोळ्यातली
वेदना आसू अन हासू
 त्यांची विचारधारा
त्यांच्याआधीच कळते
त्यांच्या शब्दांना दाद
म्हणूनच लगेच देता येते.

नको तेवा चुका करवत 
अद्दल घडवून अक्कल शिकवतं
 म्हणून आयुष्य मला खूप आवडत....

आयुष्य माझा गुरू
माझा सखा माझा सांगाती
त्याच्यावाचून मी म्हणजे माती
मातीतून सौंदर्यवान घडा सतत घडवत

म्हणून तर आयुष्य मला खूप आवडत....

या आयुष्याने माझ्याकडून
खूप खूप घेतलंय
आणि खूप सारं दिलंय
कशाची किंमत नाही करत
अनमोल  माणसं
रहात भेटवत

येता जाता लबाड्या
रहात दाखवत....
त्या समजू दे पण उचलू नको
असं आपलं मज्जेत
सांगत रहात.....
म्हणून तर आयुष्य मला खूप आवडतं.....
स्मिता शेखर कोरडे
अहमदाबाद
१३,०२, २०१२

Sunday 7 July 2013

My own blog and happy Kavita reading!


आयुष्याच्या संध्याकाळी……………
·         स्मिता शेखर , अहमदाबाद
·         SMITA SHEKHAR, Ahmedabad                                                 Feb 19, 2012
युष्याच्या संध्याकाळी वाढदिवस असा व्हायला हवा……….
गेल्या दिवसांच्या कडू आणि गोड आठवणी
आलेल्या अडचणी
अन त्यांना दिलेली मात
मिळवलेले प्रेम
अन जोडलेली नाती
मैत्रीचे रेशमी बंध
अन घडवलेल्या कर्तृत्वाची
सोनेरी पानं
लाडक्यांचे लाड
अन दोड्क्यांच्या शिव्या
सगळ्या घटना चित्रपट बनून
डोळ्या समोरून सरकायला हव्या

येणाऱ्या आनंदाच्या चाहुली
पावलोपावली  यायला हव्या
तृप्ततेचा हुंकार हृदयाने
आतून द्यायला हवा
आप्तांच्या मित्रांच्या चेहेऱ्यावरच्या
सुख दुखांच्या रेषा नजरेने अलगद टिपायला हव्या
रात्री बारा वाजल्यापासूनच
माझा फोन खणखणायला हवा
एकाला होल्ड वर दुसरयाला हलकेच कटवायला हवा

लंच आणि डिनर चा मेनू ठरवता ठरवता
न खाताच वजनाचा काटा दिसायला हवा
आणि त्याच्याकडे  दुर्लक्ष करून
केक चा बाईट घ्यायलाच हवा
रगडा-पेटीस बटाटावडा,
मैत्रीणीना आज तरी खिलवायला हवा
नवा ड्रेस शिंप्याने द्यायलाच हवा
रोज विसरत असले तरी
देवाला नमस्कार आज नक्कीच करायला हवा

एक मस्त धम्माल पार्टी
हातात वाईन चा प्याला यायलाच हवा
Past साठी no regrets म्हणत
आल्या दिवसाला welcome करायला हवा

Show must go on म्हणत
हसरा चेहरा अगदी आतून खरा खरा ठेवायला हवा
नवऱ्याकडे फेकलेल्या romantic नजरांचा
positive effect व्हायला हवा
त्याच्या कडून solitaire मिळायलाच हवा
सुनबाई ला किल्लीचा जुडगा आता द्यायलाच हवा
सार करता करता हळूच
हात काढून घ्यायला हवा
आपला ज्ञाना चा ठेवा
आता द्यायला हवा
दानाला हात पुढे व्हायला हवा
इतरांच्या गुंणाना वाव द्यायला हवा
माझ्यातल्या कलाकाराला
न्याय आता तरी द्यायलाच हवा

मैत्रींनीसह दंगा करायला हवा
Life time achievement च्या nomination ला
माझ्या नावाचा पुकारा व्हायलाच हवा
जगाव तर अस - असा भाव सर्वांच्या नजरेत
मला पाह्यलाच हवा
Exit ला टाळ्यांचा गजर ऐकायलाच हवा
आयुष्याच्या संध्याकाळी
वाढदिवस असा मस्त व्हायला हवा
व्हायलाच  हवा!