आयुष्याच्या संध्याकाळी……………
·
स्मिता शेखर , अहमदाबाद
·
SMITA SHEKHAR, Ahmedabad Feb
19, 2012
गेल्या
दिवसांच्या कडू आणि गोड आठवणी
आलेल्या
अडचणी
अन
त्यांना दिलेली मात
मिळवलेले
प्रेम
अन
जोडलेली नाती
मैत्रीचे
रेशमी बंध
अन
घडवलेल्या कर्तृत्वाची
सोनेरी
पानं
लाडक्यांचे
लाड
अन
दोड्क्यांच्या शिव्या
सगळ्या
घटना चित्रपट बनून
डोळ्या
समोरून सरकायला हव्या
येणाऱ्या
आनंदाच्या चाहुली
पावलोपावली यायला हव्या
तृप्ततेचा
हुंकार हृदयाने
आतून
द्यायला हवा
आप्तांच्या
मित्रांच्या चेहेऱ्यावरच्या
सुख
दुखांच्या रेषा नजरेने अलगद टिपायला हव्या
रात्री
बारा वाजल्यापासूनच
माझा
फोन खणखणायला हवा
एकाला
होल्ड वर दुसरयाला हलकेच कटवायला हवा
लंच
आणि डिनर चा मेनू ठरवता ठरवता
न
खाताच वजनाचा काटा दिसायला हवा
आणि
त्याच्याकडे दुर्लक्ष करून
केक
चा बाईट घ्यायलाच हवा
रगडा-पेटीस
बटाटावडा,
मैत्रीणीना
आज तरी खिलवायला हवा
नवा
ड्रेस शिंप्याने द्यायलाच हवा
रोज
विसरत असले तरी
देवाला
नमस्कार आज नक्कीच करायला हवा
एक
मस्त धम्माल पार्टी
हातात
वाईन चा प्याला यायलाच हवा
Past
साठी no regrets म्हणत
आल्या
दिवसाला welcome करायला हवा
Show
must go on म्हणत
हसरा
चेहरा अगदी आतून खरा खरा ठेवायला हवा
नवऱ्याकडे
फेकलेल्या romantic नजरांचा
positive
effect व्हायला हवा
त्याच्या
कडून solitaire मिळायलाच हवा
सुनबाई
ला किल्लीचा जुडगा आता द्यायलाच हवा
सार
करता करता हळूच
हात
काढून घ्यायला हवा
आपला
ज्ञाना चा ठेवा
आता
द्यायला हवा
दानाला
हात पुढे व्हायला हवा
इतरांच्या
गुंणाना वाव द्यायला हवा
माझ्यातल्या
कलाकाराला
न्याय
आता तरी द्यायलाच हवा
मैत्रींनीसह
दंगा करायला हवा
Life
time achievement च्या nomination ला
माझ्या
नावाचा पुकारा व्हायलाच हवा
जगाव
तर अस - असा भाव सर्वांच्या नजरेत
मला
पाह्यलाच हवा
Exit
ला टाळ्यांचा गजर ऐकायलाच हवा
आयुष्याच्या
संध्याकाळी
वाढदिवस
असा मस्त व्हायला हवा
व्हायलाच हवा!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteआषाढस्य प्रथम दिवसे.....
ReplyDeleteसौ. स्मिता शेखर कोरडे
‘महाराष्ट्र समाज’ भद्र आणि ‘विविधा’ यांनी संयुक्त पणे ९ जुलै,२०१३ ला कवी कालिदास दिन साजरा केला. उषा पोतनीस, वैशाली वर्तक, सुनिता कार्लेकर, नीला रिसवडकर, साधना पाटील, अनुराधा रानडे, रेखा गोस्वामी, जयश्री भावे, अपर्णा पिंपळस्कर, सुषमा चौसाळकर, चारुता पिपळापुरे, गीता पटेल, श्रीधर जोशी आणि स्मिता कोरडे यांनी स्वरचित कविता वाचल्या. सर्वच कविता विविध विषया वरच्या आणि श्रवणीय होत्या.
चारुता पिपळापुरे यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले होते.
महाराष्ट्र समाजाच्या, शिक्षण विभागाच्या चिटणीस सौ. स्मिता कोरडे यांनी समाजा तर्फे सर्व हौशी कवी/कवियत्री आणि श्रोतृवृन्दाचे आभार मानले.